बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

बाळू धानोरकर यांना आज अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

| Updated on: May 31, 2023 | 12:55 PM

त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यभरातील नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरोरा येथे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे दिल्लीत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. राज्यभरातील नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरोरा येथे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरोऱ्यात जाऊन धानोरकर यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, खासदार इम्रान प्रतापगढी, सुनील केदार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत यांच्यासह अन्य नेते अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असणार आहेत. तर बाळू धानोरकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून मोठी गर्दी केली होती.