Pune | आळंदीत बंडातात्या कराडकर वारीत दाखल, नियम डावलून पायवारीला सुरुवात

| Updated on: Jul 02, 2021 | 8:04 PM

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आळंदीत वारीत दाखल आहेत. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली आहे.

आळंदी : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आळंदीत वारीत दाखल आहेत. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली आहे. बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत, असे असले तरी बंडातात्या हे वारीत सहभागी झाले आहेत. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आज ते स्वतः वारीत सहभागी झाले आहेत. (Bandatatya karadkar participated in Ashadhi wari in Alandi)

वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच

वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी ते पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले होते.

संबंधित बातम्या

Alandi Palkhi | आळंदी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट, 37 वारकरी पॉझिटिव्ह

यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

(Bandatatya karadkar participated in Ashadhi wari in Alandi)

Published on: Jul 02, 2021 08:04 PM
Breaking | मराठा आरक्षणाप्रश्नी चंद्रकांत पाटील यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Devendra Fadnavis | जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी चौकशी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने : फडणवीस