इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर भागात बुधवारी रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई – मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर भागात बुधवारी रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “शास्त्री नगर येथे घर कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 16 जण किरकोळ जखमी झाले आहेत. इतर जखमींच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने ट्विट केले की, बचाव कार्य अजूनही सुरू आहे. रात्री 12.15 च्या सुमारास इमारत कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 जण रुग्णालयात दाखल असून ते आता सुरक्षित आहेत. हे सर्व बिहारमधील मजूर आहेत. बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दल आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत असं डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले.
Published on: Jun 09, 2022 11:06 AM
Latest Videos