मनसे इम्पॅक्ट ! माहिमधील मजारीवरील कारवाईनंतर मनसेनं काय केली बॅनरबाजी?

| Updated on: Mar 23, 2023 | 3:12 PM

VIDEO | राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही, तोर्यंत माहिममधील मजारीवर केली कारवाई, बघा मनसेने काय केली बॅनरबाजी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई सुरु झाली. राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीत नवीन हाजी अली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा भ।षणात केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दर्ग्याची पाहणी करून तिथले अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. माहिमधील मजारीवरील कारवाईनंतर मनसेने जोरदार बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळले. या बॅनरवर मनसे इम्पॅक्ट असे म्हणत बारा तासाच्या आत माहीम आणि सांगली कारवाई पूर्ण असा आशय लिहिल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 23, 2023 03:12 PM
भाजप घाबरलंय, त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई; नाना पटोले यांचं टीकास्त्र
विधिमंडळाच्या आवारातील ‘जोडे मारो’ आंदोलनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…