ठाकरे-शिंदे गटात नवा संघर्ष; वर्धापनदिनी मातोश्रीबाहेर दोन्ही गटाकडून बॅनरबाजी!
शिवसेनेच्या आज 57 वा वर्धापनदिन आहे. या दिनानिमित्ती दोन्ही गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनामुळे ठाकरे आणि शिंदे गटाकडून मुंबई, ठाण्यात जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मुंबई : शिवसेनेच्या आज 57 वा वर्धापनदिन आहे. या दिनानिमित्ती दोन्ही गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनामुळे ठाकरे आणि शिंदे गटाकडून मुंबई, ठाण्यात जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत. सर्वाधिक बॅनर्स वांद्रे येथील कलानगरातील मातोश्री परिसरात लागले आहेत. या होर्डिंग्ज आणि बॅनर्समधून एकमेकांना डिवचण्याचं काम करण्यात आलं आहे. कलानगर परिसरात सर्वाधी शिंदे गटाचे बॅनर्स लागले आहेत. कलानगरच्या ब्रीजवरही शिंदे गटाचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागले आहेत.शिंदे गटाच्या बॅनर्सवर वाघ निघाले गोरेगावला… वाघांचा वारसा… असं लिहिलं आहे. या होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. मातोश्रीतून बाहेर पडताच हे बॅनर्स दिसत आहेत.