बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
लोकसभा निवडणुकीनंतर कोकणात रंगला बॅनरवार. महाविकास आघाडी नाही तर थेट महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमधील या बॅनरवारची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Kankavalit Banner War : काही दिवसांआधी कणकवली शिवसेना शाखेबाहेर बॅनर लावण्यात आला होता. ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असं लिहून त्या बॅनरवर शिवसेना नेते उदय सामंत अन् त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर आता कणकवलीत बॅनर वॉर सुरु झालं आहे. बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचे जोरदार उत्तर दिलं आहे. कणकवलीमधील शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावर आले आहे. पटवर्धन चौकात रात्री हे बॅनर लावले आहेत.
Published on: Jun 16, 2024 01:05 PM
Latest Videos