औरंगाबादमध्ये बीआरएसची चर्चा कसली रंगली? हर्षवर्धन जाधव यांच्या फोटोवर कोणता उल्लेख?
आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएसमधील प्रवेश ही भाजपची डोकेदुखी ठरू शकते.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून ठसा उमटिवणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात गुरुवारी प्रवेश केला. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएसमधील प्रवेश ही भाजपची डोकेदुखी ठरू शकते. याचदरम्यान आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या भावी खासदार आशयाच्या बॅनरला पेव फुटले आहेत. आता असाच बॅनर छत्रपती संभाजीनगरमध्ये लागले असून ते बीआरएसचे आहेत. तर यावर हर्षवर्धन जाधव यांचा भावी खासदार असा उल्लेख आहे. त्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे.