Rangoli | 40 किलो साबूदाण्यापासून साकारली शंकर पार्वतीसह बाप्पाची रांगोळी

Rangoli | 40 किलो साबूदाण्यापासून साकारली शंकर पार्वतीसह बाप्पाची रांगोळी

| Updated on: Sep 09, 2022 | 2:59 PM

Rangoli | 40 किलो साबूदाण्यापासून शंकर पार्वतीसह बाप्पाची रांगोळी साकारण्यात आली.

Rangoli | 40 किलो साबूदाण्यापासून (sago) शंकर पार्वतीसह बाप्पाची रांगोळी (Rangoli)साकारण्यात आली. मुलुंडमध्ये गणेश चतुर्थीनिमित्तही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळी इतकी सुबक आणि हुबेहुब काढली आहे की, साक्षात शंकर पार्वती, कार्तिक स्वामी आणि गणपत्ती बाप्पा समोर उभे ठाकल्याचा भास होतो. मुलुंडमध्ये साडेपाच फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली आहे. 7 ते 18 सप्टेबर दरम्यान रांगोळी प्रदर्शन असेल. या रांगोळीसाठी40 किलो साबूदाण्याचा वापर करण्यात आला आहे. मोहन कुमार दोडेच्या यांनी ही रांगोळी साकारली आहे. भाविकभक्तांनी ही रांगोळी पाहुन आश्चर्य़व्यक्त केले. चार पाच रांगोळीकारांनी ही रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल एक महिना लागला आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे कलाकार रांगोळी साकारण्यासाठी झटत होते.

Published on: Sep 09, 2022 02:55 PM