संजय राऊत यांना धमकी; अजित पवार म्हणतात, धमकी आली असेल तर...

संजय राऊत यांना धमकी; अजित पवार म्हणतात, धमकी आली असेल तर…

| Updated on: Apr 01, 2023 | 1:45 PM

मी सभागृहात बोललो होतो की, नितीन गडकरींना धमकी आली होती. शरद पवारसाहेबांना धमकी आली होती. त्यामुळे या धमक्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणालेत. पाहा...

बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर त्यांना धमकी आली असेल, तर त्यांनी रीतसर तक्रार दाखल करावी. पोलिसांनीही या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा. जनतेच प्रतिनिधित्व करणाऱ्यांना अशा प्रकारे धमकी आल्या तर लोकसभा आणि राज्यसभा याची नोंद घेत असते. याबाबतीत मी अधिक माहिती घेईन. संजय राऊत यांना मदत झाली आहे की नाही याची माहिती घेऊन त्यांना हवं ते सहकार्य करेल, असं अजित पवार म्हणाले आहेत. ते बारामतीत बोलत होते.

Published on: Apr 01, 2023 01:45 PM