बार्शी: वादळी वाऱ्यासह पाऊस, झाड कोसळून चार दुचाकींसह चारचाकीचा चुराडा
बार्शी शहराला पावसाने झोडपले आहे. शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने झाडाच्या अडोशाला पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर: बार्शी शहराला पावसाने झोडपले आहे. शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने झाडाच्या अडोशाला पार्क केलेल्या चार दुचाकींसह एका चारचाकी वाहानाचा चुराडा झाला आहे. या घटनेत वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
Latest Videos