मुख्यमंत्री म्हणतात मी नाही, मग मॉरिशसमधून आदेश आला का? राऊतांचा निशाना फडणवीस यांच्यावर निशाना

मुख्यमंत्री म्हणतात मी नाही, मग मॉरिशसमधून आदेश आला का? राऊतांचा निशाना फडणवीस यांच्यावर निशाना

| Updated on: Apr 29, 2023 | 1:25 PM

त्यांनी फडणवीस हे मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणासाठी गेले आहेत. मात्र तेथून ते वेगळा आदेश देतात.

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण आता बारसू आंदोलनामुळे (Barsu Movement) चिघळले आहे. काल सरकारकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला जात आहे. तर प्राण गेले तरी चालेल पण आम्ही जमिनी सोडणार नाही, असं स्थानिक लोक म्हणत आहेत. पण सौदी अरेबेयिताली ऑयल रिफायनरीसाठी (Oil Refinery) रत्नागिरीतील मराठी माणसावर हे हिंदुत्ववादी सरकार हल्ले करत आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाना साधला. त्यांनी फडणवीस हे मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणासाठी गेले आहेत. मात्र तेथून ते वेगळा आदेश देतात. काही झालं तरी आंदोलकांना बाहेर काढा. बळाचा वापर करा. आंदोलकांना हुसकावून लावा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसमधून दिले आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.

Published on: Apr 29, 2023 12:43 PM