उद्धव ठाकरेंच्या लाचार मुख्यमंत्री टीकेला शिवसेना नेत्याचं जशाचतस प्रत्युत्तर
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कालच्या महाडच्या सभेत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत असं म्हटलं.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणातील वातावरण प्रचंड तापले आहे. कर्नाटकमध्ये निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यावेळी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. ते आज बेळगावमध्ये अरणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कालच्या महाडच्या सभेत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत असं म्हटलं. तसेच लाज वाटायला पाहिजे, बोंबलून झालं असेल. हिंमत असेल तर मिंद्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला हारवा असे आवाहन लोकांना करायला पाहिजे. मात्र त्यांची जाहिरात कन्नडमध्ये येते असं म्हटलं होतं. त्या टीकेवर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये जावे दुसऱ्याला शहाणपण शिकू नये तुम्हाला सभा घ्यायला कोणी रोखले आहे, संजय राऊत सारख्या तीन पाट माणसाला पाठवता आणि इथे बसून त्याच्यावर कॉमेंट करताय. उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कर्नाटक मध्ये सभा घेऊन दाखवावी असे आवाहन केलं आहे.