बारसू रिफायनरीवरून ठाकरे गट आक्रमक, खासदार राऊत घेणार आंदोलनकर्त्यांची भेट
राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात आंदोलन करत आहेत.
राजापूर : बारसूमध्ये होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) ग्रामस्थांचा विरोध आहे. म्हणून ते आंदोलन करत आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आज बारसू रिफायनरी (Barsu Refinery Project)आंदोलनात महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. या विषयावर राजकीय वातावरण तापले आहे. यावरून ठाकरे गट देखील आता आक्रमक झाल्याचे दिसत असून खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) हे बारसू सोलगाव येथे जाणार आहेत. तर ते बुधवारी सकाळी भेट देणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष रखरखत्या उन्हात आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकारी यांना सर्व्हेक्षण रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही सर्वेक्षण सुरू आहे. पोलिसांच्या दडपशीने ग्रामस्थांचा विरोध चिरडून विनाकारण ग्रामस्थांना अटक करण्यात येत असल्याचे खासदार राऊत यांनी म्हटलं आहे.