Special Report | बारसू प्रकल्प; उद्धव ठाकरे- नारायण राणे आमने -सामने, राजकीय तापमान वाढले
बारसूवरून कोकण तापला आहे. राणेंच्या धमकीला खासदार राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही ही धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. हिंमत असेल तर अडवून दाखवा. आम्ही येतोय.
मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बारसूमध्ये जाणार आहेत. ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे बारसूवरून कोकण तापला आहे. राणेंच्या धमकीला खासदार राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही ही धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. हिंमत असेल तर अडवून दाखवा. आम्ही येतोय. अडवून दाखवा, असं आव्हानच राऊतांनी राणे यांना नाव न घेता दिलं आहे. तर कोकण कुणाच्या मालकीचं नाही असे म्हणत त्यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: May 01, 2023 07:06 AM
Latest Videos