रत्नागिरीत राज तर महाडमध्ये उद्धव यांची तोफ धडाडणार? कोणाचा घेणार ठाव?

रत्नागिरीत राज तर महाडमध्ये उद्धव यांची तोफ धडाडणार? कोणाचा घेणार ठाव?

| Updated on: May 06, 2023 | 9:55 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 मे रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी कोकणात दोन ठाकरी तोफ दाखल होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही जाहीर सभेची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे.

रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बारसूमध्ये जाणार आहेत. तर ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं होतं. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 6 मे रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी कोकणात दोन ठाकरी तोफ दाखल होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही जाहीर सभेची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाड तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची रत्नागिरी किंवा मालवण याठिकाणी होणार आहे. याच्याआधी उद्धव ठाकरे यांची सभा कोकणात झाली असून त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. तर रत्नागिरीमधील राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Published on: May 06, 2023 09:55 AM