Ratnagiri Barsu Refinery | आता बदडताय कदाचित गोळ्याही झाडाल; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

Ratnagiri Barsu Refinery | आता बदडताय कदाचित गोळ्याही झाडाल; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Apr 28, 2023 | 3:49 PM

एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार हे आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे लोकांना गुरासारखं मारत आहे. कदाचित त्यांच्यावर गोळ्या झाडाल. ती भूमी तुम्ही रक्ताने माखाल असा घणाघात केला आहे.

नवी दिल्ली : बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे. आजही सुरू असणाऱ्या रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. त्यावरून पोलीसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांडया फोडत, आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत टीका केली आहे. यावेळी त्यांनी, एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे लोकांना गुरासारखं मारत आहे. कदाचित त्यांच्यावर गोळ्या झाडाल. ती भूमी तुम्ही रक्ताने माखाल असा घणाघात केला आहे. तर दिल्लीश्वरांच्या आदेशावर कोकणामध्ये हा सगळा अमाणूष‌ खेळ सुरू असल्याची टीका केली आहे. तर फायदा आणि तोटा हे गणित लावून स्थानिकांवर अमानुष लाठी हल्ला सुरू आहे. ही लोकशाही नाही. शरद पवार यांनी सुद्धा आवाहन केलं की चर्चेतून तोडगा निघावा. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा बोललं असताना मात्र देवेंद्र फडणवीस काहीही बोलायला तयार नाही. त्यांनीत जाताना हे मोगलाईनचे आदेश दिलेत अशी टीका केली आहे.

Published on: Apr 28, 2023 03:49 PM