Ratnagiri Barsu Refinery | कोकणातील वातावरण तापलं; अखेर बारसू रिफायनरी विरोधात ग्रामस्थांचा संपात उफाळला
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी त्यांचा कडवा विरोध केला आहे. यावरून पोलीसांनी बळाचा वापर करत ग्रामस्थांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडया फोटल्या, लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) कोकणातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे. तर त्याला शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Group) पाठिंबा दिला आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित आज मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्यापूर्वीच विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ग्रामस्थ मात्र चांगलेच आक्रमक झाले असून जिथे सर्वेक्षण सुरू आहे तिथे ते घुसले आहेत. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असतांनाच स्थानिक नागरिकांनी त्यांचा कडवा विरोध केला आहे. यावरून पोलीसांनी बळाचा वापर करत ग्रामस्थांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या, लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यावरून येथील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
