बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांचा अपघात; गाडी उलटली, 17 पोलीस जखमी

बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांचा अपघात; गाडी उलटली, 17 पोलीस जखमी

| Updated on: Apr 24, 2023 | 12:23 PM

राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तसाठी जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू रिफायनरीसाठी आज सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेल्या सर्व्हेला आजपासून सुरूवात होणार असून रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत. तर विरोध पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तसाठी जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात 17 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर हा अपघात कशेडी गावाजवळ झाला. तर येथील कशेळी बांध येथे एका वळणावर गाडी थेट खाली पडल्याने हा अपघात झाला.

Published on: Apr 24, 2023 12:23 PM