प्रकाश आंबेडकरांचा बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अजब सल्ला; म्हणाले, तर...

प्रकाश आंबेडकरांचा बार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना अजब सल्ला; म्हणाले, तर…

| Updated on: Apr 13, 2023 | 8:06 AM

ते म्हणाले की, ओबीसी समाजाचे आमदार, खासदार आपली बाजू सरकारसमोर ठेवतात. पण, अनुसूचित जातीचे आमदार, खासदार हे करत नाहीत. त्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या आमदार खासदारांना मारा

मुंबई : राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या प्रमुख मागणीसाठी मागील दिड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला. ज्याची चर्चा होताना दिसत आहे. ते म्हणाले की, ओबीसी समाजाचे आमदार, खासदार आपली बाजू सरकारसमोर ठेवतात. पण, अनुसूचित जातीचे आमदार, खासदार हे करत नाहीत. त्यामुळे तुमचा प्रश्न सुटत नसेल तर या आमदार खासदारांना मारा. तर हा मुद्दा आपण मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे आंबेडकर म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आश्वासन दिले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 13, 2023 08:06 AM