नागपुरातील कोंढाळी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर, श्रेयवादावरून काका-पुतण्यात रस्सीखेच
शासनाच्या माध्यमातून कोंढाळी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी काढलेल्या अधिसूचनेत याचा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोंढाळी नगरपंचायत करण्याच श्रेय घेण्यासाठी देशमुख काका पुतण्यामध्ये लढाई सुरु झाली आहे.
नागपूर : काटोल तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या कोंढाळी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा ही मागणी अनेक काळापासून प्रलंबित होती. ही मागणी लक्षात घेता या भागाचे आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्यावतीने सात्याने या संदर्भात पाठपुरावा केला जात होता. दरम्यान शासन आदेश पारित करुन कोंढाळी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी काढलेल्या अधिसूचनेत याचा उल्लेख करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोंढाळी नगरपंचायत करण्याच श्रेय घेण्यासाठी देशमुख काका पुतण्यामध्ये लढाई सुरु झाली आहे. अनिल देशमुख यांनी आपण या मागणीसाठी पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे, तर आशिष देशमुख यांनी मी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा केला आहे.
Published on: Jun 22, 2023 12:55 PM
Latest Videos