बावनकुळे- आव्हाड पुन्हा एकदा आमने-सामने, दर्ग्यारून बावनकुळेंची आव्हाडांवर टीका

बावनकुळे- आव्हाड पुन्हा एकदा आमने-सामने, दर्ग्यारून बावनकुळेंची आव्हाडांवर टीका

| Updated on: Jan 06, 2023 | 4:20 PM

आव्हाड यांनी चंद्रपूर येथील दर्ग्यातील एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केल्यानंतर आता बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना माहित आहे

मुंबई : राज्यातील वादग्रस्त विधानावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

तसेच बावनकुळे यांच्या औरंगजेबजी विधानावरून वादगं झाल्यानंतर त्यांनी सावरासावर केली. मात्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना कोडींत पकडण्यासाठी चंद्रपूर येथील दर्ग्यातील एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केला. त्यानंतर आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आव्हाड यांनी चंद्रपूर येथील दर्ग्यातील एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केल्यानंतर आता बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना माहित आहे. औरंग्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रद्धास्थान आहे. हे आव्हाड्यासारख्यांनी अनेकदा सिद्ध केल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Published on: Jan 06, 2023 04:20 PM