Nitin Gadkari : बावनकुळेंनी बायको पळवून आणली, नितीन गडकरींनी गुपित केलं उघड
त्यांनी बायको पळवून आणली. त्यांची बायको कुणबी समाजाची आहे आणि ते तेली समाजाचे आहेत. त्याचे वडील, त्याचे भाऊ गरिबीची परिस्थिती होती.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार सोहळ्यात चांगलीच फटकेबाजी केली. नितीन गडकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकर्दीची सुरुवात ऑटोरिक्षा ड्रायव्हर म्हणून झाली. त्यांनी बायको पळवून आणली. त्यांची बायको कुणबी समाजाची आहे आणि ते तेली समाजाचे आहेत. त्याचे वडील, त्याचे भाऊ गरिबीची परिस्थिती होती. कोराडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन गेली. त्यावेळी संघर्ष करून त्यांनी ती मिळविली. सुरुवातीला बावनकुळेंनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं. भाजपची जिल्ह्यातील स्थिती चांगली नव्हती. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर कामठी मतदारसंघ मजबूत केलं. जिल्ह्यात भाजप भक्कम करण्याचं काम बावनकुळे यांनी केलं. त्यासाठी खूप मेहनत घेतली. झोकून देऊन काम करणारा जिद्दीचा कार्यकर्ता म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे होय.