Sharad Pawar | रस्ते, पाणी, रोजगार असो, जे अहिल्याबाईंनी केले तेच तुमचा आमदार करतोय
आज अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय’, असंही पवार यावेळी म्हणाले.
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी रोहित पवारांचं (Rohit Pawar) तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. ‘आज अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय’ अशा शब्दात पवार यांनी नातू रोहित पवारांचं कौतुक केलं.
Published on: May 31, 2022 08:16 PM
Latest Videos