VIDEO | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेनंतर थेट बारामतीत मोरांचा थुईथुई नाच, मनमोहक दृष्य कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Mar 24, 2021 | 4:00 PM

बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. (Beautiful Peacock dance in Baramati)

बारामती : नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, हे गाणं ऐकलं तरी थुईथुई नाचणारा मोर आपल्या डोळ्यासमोर येतो. मोर नाचतानाचे दृष्य फार क्वचित पाहायला मिळते. पण बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. (Beautiful Peacock dance in Baramati)

बारामतीतील जराडवाडी या ठिकाणी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. त्यामुळे पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोरालाही आपला मोह आवरता आला नाही. या ठिकाणी रानात असलेला मोर चक्क पिसारा फुलवून नाचू लागला. हा मोर नाचतानाचं दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षातून हा मोर या ठिकाणी वास्तव्यात आहे. त्यामुळे या मोरालाही या ठिकाणी राहणाऱ्या माणसांचा लळा लागला असल्याचे बोललं जात आहे.

Published on: Mar 24, 2021 12:00 PM