शिंदे – फडणवीस सरकारविरोधात मनसेची ‘आर या पार’ लढाई
शिंदे फडणवीस सरकारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनसे महामोर्चा काढणार आहे.
यवतमाळ : राज्यातील शिंदे-फडणवीस ( shinde fadnavis government ) सरकारच्या विरोधात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामोर्चा निघणार आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. या महामोर्चामधून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
यवतमाळमधील वणी शहरात हा मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर हा मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलाचा प्रश्न, पीक विमा यासोबतच शेतीला दिवस रात्र वीज आणि पाण्याचा पुरवठा करणे आदी मागण्यावर हा मोर्चा निघणार आहे.
शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मनसेचा निघणारा हा पहिलाच मोर्चा आहे. ‘शेतकऱ्यांच्या सन्मानात, मनसे मैदानात’ अशी फलकबाजी करत मनसे मैदानात उतरली आहे.
Published on: Jan 20, 2023 11:49 AM
Latest Videos