Santosh Deshmukh Case : ‘हो, मीच हत्या केली..’; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख यांची हत्या आपणच केली असल्याचा कबुली जबाब सर्व आरोपींनी दिलेला आहे. खंडणी आणि धमकीचे फोन देखील आपणच केले असल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे.
हो, मीच संतोष देशमुखचं अपहरण करून हत्या केली, अशी कबुली आरोपी सुदर्शन घुले याने दिली आहे. पोलीस कोठडीत जयराम चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार यांनी ही कबुली दिली आहे. पोलिसांकडून याआधी आरोपींचे जबाब घेण्यात आलेले होते. ते काल आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेले होते. त्यानंतर आता संपूर्ण हत्याप्रकरणाची कबुली सुदर्शन घुले याने दिलेली आहे. तर दुसरीकडे आवादा कंपनीमध्ये खंडणी मागणे, अधिकाऱ्यांना फोन करून धमकावणे, कंपनीमध्ये जाऊन गोंधळ घालणे याचीसुद्धा कबुली सुदर्शन घुलेने दिलेली आहे. त्याचे इतर सहआरोपींनी देखील अशाच प्रकारची कबुली पोलिसांना दिलेली आहे. त्यामुळे आरोपींनी स्वत:हून गुन्ह्याचा कबुली जबाब दिलेला असल्याने आता त्यावर कोर्टाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल.