Beed Crime : बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
Beed Crime News Updates : बीडच्या आष्टी तालुक्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झालेली बघायला मिळाली आहे. एका तरुणाला 2 दिवस बांधून ठेवत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
बीडमध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप होतं आहे. मारहाणीत विलास बनसोड या तरुणाचा मृत्यू झाल्याचा या तरुणाच्या कुटुंबियांचा आरोप आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत तरुण हा बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता. गेल्या 2 दिवसांपासून त्याला बांधून ठेवण्यात आलेलं होतं. त्याला मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर या तरुणाला एका रुग्णालयात टाकून त्याच्या घरच्यांना त्याला घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. या घटनेत त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. तर या घटनेचे फोटो समोर आले असून या फोटोवरून ही संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
