पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दीच गर्दी; लोकसभेच्या पराभवानंतर समर्थक ढसाढसा रडले

| Updated on: Jun 06, 2024 | 3:46 PM

निर्णायक आघाडी मिळत असताना पंकजा मुंडे यांच्या आघाडीत मोठी घट झाल्यानंतर बजरंग सोनवणे शेवटच्या मतमोजणीत आघाडीवर गेले आणि त्यांचा विजय झाला. बीड लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे आज कार्यकर्त्यांच्या समोर आल्या. परळीतील यशश्री निवासस्थानी पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.

Follow us on

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत यांना 6,74,984 मते मिळाले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना 6,81,569 मते मिळाली. म्हणजेच पंकजा मुंडे यांचा 6,585 मतांनी पराभव झाला आहे. निर्णायक आघाडी मिळत असताना पंकजा मुंडे यांच्या आघाडीत मोठी घट झाल्यानंतर बजरंग सोनवणे शेवटच्या मतमोजणीत आघाडीवर गेले आणि त्यांचा विजय झाला. पंकजा मुंडे यांनी बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील फेर मतमोजणीची मागणी केली होती परंतु निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी ही मागणी फेटाळली. बीड लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे आज कार्यकर्त्यांच्या समोर आल्या. परळीतील यशश्री निवासस्थानी पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. यादरम्यान मुंडे समर्थक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत जोमाने काम केले तसेच काम विधानसभा निवडणुकीत करून पाठीशी उभे राहण्याचं आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं आहे.