रात्री उशीरा भेट अन् तासभर चर्चा; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण…

| Updated on: Jun 13, 2024 | 2:06 PM

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशातच रात्री उशिरा बीडचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बंजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी दाखल होत भेट घेतली असून तासभर त्यांच्याशी चर्चा केली आहे. माध्यमांशी बोलतना बजरंग सोनवणे म्हणाले...

Follow us on

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. अशातच रात्री उशिरा बीडचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बंजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी दाखल होत भेट घेतली असून तासभर त्यांच्याशी चर्चा केली आहे. माध्यमांशी बोलतना बजरंग सोनवणे म्हणाले, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक झाली आहे म्हणून मी भेटायला आलो आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि जरांगे पाटील यांना पाणी घ्यावे, अशी विनंतीही केली. पण जरांगे पाटील मला म्हणाले की माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मी हे करत आहे. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी ठाम आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर मार्ग काढला पाहिजे. सरकारने त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे. उद्या सर्व खासदारांना सकाळी संपर्क करणार आहे आणि त्यांना एकत्र करून राज्यपालांची भेट घेणार आहे. या ठिकाणी समाजाचा विषय येतो तर राजकारणाचा विषय नाही, ज्या ठिकाणी राजकारणाचा विषय येतो त्या ठिकाणी हा विषय बोलू, असा सल्लाही त्यांनी दिला.