Beed Morcha: ‘दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा…,’ खासदार बंजरंग सोनावणे यांचा इशारा

| Updated on: Dec 28, 2024 | 4:38 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २० दिवस होऊनही प्रमुख आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे संतोष यांना न्याय मिळण्यासाठी विरोधकांनी शनिवारी बीड जिल्ह्यात मोर्च्याचे आयोजन केले आहे. या मोर्चात खासदार बजरंग सोनावणे यांनी भाषण करीत ३०२ चा गुन्ह्याखाली वाल्मिकी कराडला अटक करण्याची मागणी केली आहे.

संतोष अण्णाला न्याय मिळण्यासाठी आपण लढत आहे. अजूनही त्यांच्या हत्येच्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक झालेली नाही. ज्यादिवशी आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला. या ‘आका’ चा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे. मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात राहाण्याचा अधिकार नाही अशी मागणी यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले सत्ताधारी याला जातीय राजकारण म्हणत आहे. आज आम्ही सर्व पक्षीय एकत्र आलो आहोत. यांना पद काय आम्हाला मारायला पाहीजेत काय ? याचा नाव घ्यायचे नाही, हा कोण मोठा लागून गेला आहे. हा दलाल आहे असेही खासदार बजरंग सोनावणे यांनी यावेळी म्हटले. धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बीड न्याय द्यायचा असेल, या मातीत तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा. तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आम्हाला मारायला? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी यावेळी विचारला. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी द्याच, सीआयडी आणि एसआयटीकडे चौकशी दिलेली आहे. पण ते अधिकारी कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही. वाल्मिकी कराडवर हत्येचा 302 चा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. तरच न्याय होईल. राजकारण नको. या नवीन वर्षात 2 तारखेपर्यंत अटक झाली नाही तर दिल्ली असो की महाराष्ट्र असो की बीड मी उपोषणाला बसणार आहे असेही खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

 

Published on: Dec 28, 2024 04:31 PM