Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही हे दाखवा, बच्चू कडू यांची मागणी

Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही हे दाखवा, बच्चू कडू यांची मागणी

| Updated on: Dec 28, 2024 | 2:11 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू देखील पोहचले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड येथे मोर्च्याला सुरुवात झाली. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्च्याला प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील मोर्च्यात सहभाग घेतला आहे. रस्त्यावरील गुंडा गर्दी आणि खाकीतील गुंडागर्दी दोन्ही या घटनेत सहभागी असल्याचे स्पष्टपणे या घटनेत दिसत आहे. एक म्हण आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. ही म्हणू अधोरेखित करायची नसेल तर कारवाई अतिशय पारदर्शकपणे व्हायला पाहीजे असे माझे देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. विरोधी गटातील दोन सदस्यांना या समितीत घेऊन कारवाई झाली पाहीजे असेही ते म्हणाले. सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही हे दाखवण्याची वेळ आहे अन्यथा सत्ताधाऱ्यांना हे खूप महागात पडेल असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 28, 2024 02:06 PM