Sandeep Kshirsagar Video : बीडमधून आणखी एक व्हिडीओ व्हायरल, संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला धुतलं?

Sandeep Kshirsagar Video : बीडमधून आणखी एक व्हिडीओ व्हायरल, संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरला धुतलं?

| Updated on: Mar 10, 2025 | 12:33 PM

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या काही कार्यकर्त्यांनी शोरूमच्या मॅनेजरला मारहाण केली असा आरोप केला जातोय, समोर आलेल्या व्हिडीओवर काय म्हणाले आमदार?

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सराईत गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बीडमधून मारहाणीचा आणखी एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणारे माझे कार्यकर्ते नव्हते, असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मारहाण करण्यात येत असलेल्या मॅनेजरला वाचवणारे माझे कार्यकर्ते असून हा व्हिडीओ तीन महिने जुना असल्याचा संदीप क्षीरसागर यांनी दावा केला आहे. ‘तुम्ही व्हिडीओ बघा…माझा माणूस शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करणाऱ्यांपासून वाचवतोय.. ज्या मॅनेजरला मारहाण झाली त्याने तेव्हाच तक्रार करायला हवी होती. या मारहाणीवर त्या शोरूम मॅनेजरची प्रतिक्रिया घ्यायला हवी होती. माझा माणूस जरी असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी होती’, असं संदीप क्षीरसागर म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले, शोरूम मॅनेजरने तक्रार केली असे माझ्या कानावर तरी आले नाही. सकाळपासून माहिती घेतोय त्यांच्यापैकी कोणीही कारवाई केली नाही. तुम्ही ते फुटेज बघा.. शोरूम मॅनेजरला मारहाण करणाऱ्यांची तुम्ही नावं घेताय.. ते वाचवताय की मारहाण करताय हे तुमच्या लक्षात येईल, असं स्पष्टपणे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय.

Published on: Mar 10, 2025 12:33 PM
Rohit Pawar News : आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा – रोहित पवार
Sanjay Raut News : .. तर एव्हाना आमच्या निषेधाचे मोर्चे निघाले असते; राज ठाकरेंच्या विधानावरून राऊतांचा भाजपवर टोला