निवडणूक छोटी असली तरी प्रतिष्ठेची, ही निवडणूक कार्यकर्त्यांची!; मतदानाच्या दिवशी सुरेश धस यांची प्रतिक्रिया

निवडणूक छोटी असली तरी प्रतिष्ठेची, ही निवडणूक कार्यकर्त्यांची!; मतदानाच्या दिवशी सुरेश धस यांची प्रतिक्रिया

| Updated on: Apr 30, 2023 | 1:02 PM

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : पाटोदा-शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; मतदानाला सुरुवात; सुरेश धस मतदान केंद्रावर ठाण मांडून

बीड : बीडमधील पाटोदा- शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीत भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आष्टी-कडा बाजार समिती बिनविरोध झाली आहे. पाटोदा- शिरूर बाजार समिती निवडणुकीत मात्र मोठं आव्हान आहे. सुरेश धस हे सकाळपासून मतदान केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत. आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. निवडणूक छोटी असली तरी प्रतिष्ठेची आहे, असं सुरेश धस म्हणालेत. आष्टी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. पाटोद्यात मात्र आम्हाला जमलं नाही. पण तरी ही निवडणूकदेखील आम्ही जिंकू, असंही सुरेश धस म्हणालेत. वडवणी बाजार समिती भाजपकडे होती मात्र पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे गेली. बाकी तालुक्यात जैसे थेच परिस्थिती आहे. इतर निवडणुकीला हा निकष लागत नाही.सरकार पुढील निवडणूका घ्यायला घाबरत नाही. निवडणुका न घेण्याचे पाप तर महाविकास आघाडी सरकारचं आहे, असंही सुरेश धस म्हणालेत.