Santosh Deshmukh Murder : हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी काय सांगितलं ?
. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला. ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या खुनाला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं . याप्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला. ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
हत्या किंवा खंडणीचा मामला असेल, गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर त्यामध्ये कोण माणूस आहे,गुन्हेगार कोण हे महत्वाचं नसतं. प्रत्येकाला एकच कायदा लागू होतो. मोक्का लागणं हा फार गंभीर स्वरुपाचा कायदा आहे. मोक्का हा पोलीस, सर्वसामान्य किंवा मीडियाच्या दबावाखाली लावला जात नाही. मोक्का हा एक असा कायदा आहे कोणत्या परिस्थितीतील गुन्हा, कोणत्या प्रकराचा पुरावा यासाठी मोक्का लावला तर टिकेल. नाहीतर तुम्ही फक्त दडपणाखाली मोक्का लावला तर ते टिकणार नाही, असे माजिद मेमन यांनी नमूद केलं.