Shravan : पहिला श्रावण सोमवार; त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी
अधिक मास संपला आणि राज्यात आता श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सध्या धार्मिक वातारण दिसत आहे. तर आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने राज्यासह देशात शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे.
नाशिक | 21 ऑगस्ट 2023 : अधिक मास संपला असून राज्यात आता श्रावण सुरू झाला आहे. त्यामुळे देशासह राज्यातील शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. राज्यातही सध्या श्रावणामुळे चैतन्य आणि उत्साह दिवस आहे. तर आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिव मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये विधीवत पूजा आणि आरती केली जाते. तर श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर सकाळपासूनच त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर मंदिरात झालीय.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
