Sanjay Raut | संजय राऊतांचा रोड शो, बेळगावात तुफान गर्दी

| Updated on: Apr 14, 2021 | 8:16 PM

Sanjay Raut | संजय राऊतांचा रोड शो, बेळगावात तुफान गर्दी

बेळगाव : शिवसेना नेते संजय राऊत  बेळगावच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचासाराठी ते दाखल झाले होते.  दाखल होण्याआधीच प्रशासनाने त्यांच्या भाषणासाठीचे स्टेज तोडल्याची घटना समोर आली. यावेळी संजय राऊत यांनी शेळके यांच्या समर्थनार्थ मोठा रोड शो केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्या रोड शोला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.