आठ दिवसांपासून बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन; कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

आठ दिवसांपासून बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्याचे काम बंद आंदोलन; कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

| Updated on: Aug 07, 2023 | 1:30 PM

बेस्ट बसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बेस्ट मधील कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांकरिता संपावर गेलेले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे.

मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | बेस्ट बसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बेस्ट मधील कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांकरिता संपावर गेलेले आहेत. आज संपाचा सहावा दिवस आहे. मुंबईतील 18 आगारातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे. आंदोलनची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नसून कर्मचारी आणखी आक्रमक झाले आहेत. पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी चालक व वाहकांनी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत संप सुरू केला आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत कुठलाही तोडगा न निघाल्याने कंत्राटींनी संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Aug 07, 2023 01:30 PM