‘जवळच्या मित्रांनी फसवले’, एकनाथ खडसे कोर्टाची पायरी चढले; भर कोर्टात हात जोडला
भोसरी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात तब्बल 2 वर्षानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला. मुंबई न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केलंय. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया एकनाथ खडसे यांनी पूर्ण केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी आणि वकील मोहन टेकावडे उपस्थित होते.
मुंबई : 17 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात आपली हजेरी लावली. त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला आहे. त्याची प्रक्रिया आटोपून ते कोर्टातून निघाले त्यावेळी त्यांनी भर कोर्टात हात जोडला. पुन्हा मला कोर्टाची पायरी चढू नको लागू दे रे देवा. मला माझ्याच काही राजकीय मित्रांनी फसविले. ज्यांना मी राजकारणात मदत केली होती, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मात्र, मला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायदेवतेने मला न्याय दिला असेही ते म्हणाले. पुणे भोसरी कथित गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्र्वाचीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना नुकताच नियमित जामीन मंजूर झाला आहे. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकनाथ खडसे हे पत्नी मंदाकिनी आणि वकील मोहन टेकावडे यांच्यासोबत कोर्टात आले होते. भोसरी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात अखेर तब्बल 2 वर्षानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे.