Video : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे राज्यपाल डॉ. आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले पाहिलंत?
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले, ऐका
मुंबई : 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर असंख्य आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय म्हणतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अनेकदा वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सहा मिनिटं भाषण केलं. या भाषणादरम्यान, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानासाठी दिलेल्या योगदानाला उल्लेख केला. संविधानातून डॉ.आंबेडकर यांनी सामान्य माणसाला संजीवनी दिली, असं ते म्हणाले. सामान्य माणसाला मोठ्या पदावर जाण्याचा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या योगदानामुळे मिळाला आहे. जे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेला समता आणि समानतेचं स्वप्न साकारण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करुया, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.