प्रजासत्ताक दिनी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख; पाहा काय म्हणाले...

प्रजासत्ताक दिनी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख; पाहा काय म्हणाले…

| Updated on: Jan 26, 2023 | 9:54 AM

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख केला. पाहा नेमकं काय म्हणालेत....

आज भारत देश 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख केला. “सर्वप्रथम मी देशाच्या प्रजासत्ताकाच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो”, असं म्हणत कोश्यारी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पुढे त्यांच्या भाषणात अनेक मुद्दे आले.

Published on: Jan 26, 2023 09:49 AM