bhagat Singh Koshyari Statement: राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या विकासामध्ये मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक आहे, याशिवाय उद्योग क्षेत्रामध्येही मराठी माणसाने केल्याच्या प्रगतीमुळे जगभरात नाव झाले आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्टाचे राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाशी आम्ही सहमत नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. गुजराती आणि राजस्थानी लोकं मुंबईतून निघून गेल्यास महाराष्ट्रात काय उरेल? असं विधान काळ राज्यपाल कौशारी यांनी एका कार्यक्रमात केले होते. यानंतर राज्यपालांवर टीकेचा वर्षाव होत आहे. राज्यपालांसोबतच भाजपवरसुद्धा निशाणा साधला जात होता, मात्र या विधानाशी आम्ही सहमत नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये मराठी माणसाचं श्रेय सर्वाधिक आहे, याशिवाय उद्योग क्षेत्रामध्येही मराठी माणसाने केल्याच्या प्रगतीमुळे जगभरात नाव झाले आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Published on: Jul 30, 2022 02:09 PM
Latest Videos