संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, भागवत कराडांची काय प्रतिक्रिया ?
दरम्यान, संजय राऊत यांनी काही ट्विट केले असून त्यात त्यांनी स्वतःवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख केला आहे. खोटे पुरावे सादर करून त्यांच्यावर खोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे आरोप चुकीचे आहेत. मी त्याचे खंडण करतो. आजच मला समजले. ईडी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. ईडी त्यांच काम करत आहे
संजय राऊत यांनी काही केल नसेल तर त्यांना घाबरायचं कारण नाही. शिवसेनेचे कोणी नेते आरोप करत आहेत तर ते चुकीच आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महाराष्ट्रात ईडी सक्रिय झाली असून, ईडीचे पथक शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संजय राऊत यांनी काही ट्विट केले असून त्यात त्यांनी स्वतःवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख केला आहे. खोटे पुरावे सादर करून त्यांच्यावर खोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.