भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

| Updated on: Apr 28, 2023 | 2:54 PM

Bhandara News : भाजप ही शेतकरी विरोधी, जनता त्यांना कौल देणार नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारवर निशाणा, पाहा व्हीडिओ...

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकावर निशाणा साधला आहे. भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये लोक त्यांना कौल देणार नाहीत. हे चित्र आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. जे कोणी त्यांच्यासोबत गेले त्यांचंही नुकसान होणार आहे, असंही पटोले म्हणाले आहेत. राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडतेय. त्यावरही पटोले बोलले आहेत. काँग्रेसच्याच विचारांच्या उमेदवाराच्या विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. खारघरमध्ये जी घटना घडली. त्याच्यावर सत्ताधाऱ्यांनी बोललं पाहिजे. मूळ प्रश्नावर आलं पाहिजे. विधानसभेत जे लोकांसाठी घोषणा करता ते त्यांच्या शब्दावर खरे उतरत नाहीत, असंही पटोले म्हणालेत.

Published on: Apr 28, 2023 02:54 PM