लसनिर्मिती 24 तास सुरु,18 राज्यांना कोव्हॅक्सिनचा पुरवठा, भारत बायोटेकचं स्पष्टीकरण

| Updated on: May 12, 2021 | 6:37 PM

भारत बायोटेकनं 18 राज्यांना कोरोना लसींचा पुरवठा केल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. Bharat Biotech covaxin vaccine

नवी दिल्ली: कोवॅक्सिन लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकनं 18 राज्यांना कोरोना लसींचा पुरवठा केल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. भारत बायोटेक 24 तास लसींचं उत्पादन करत आहे. भारतामध्ये कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींची निर्मिती करण्यात येत आहे. कोविशील्ड लसीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडून तर कोवॅक्सिन लसीची निर्मिती भारत बायोटक करत आहे.