आम्हाला 7 मंत्रिपदं मिळणार अन् मीच रायगडचा पालकमंत्री होणार, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

“आम्हाला 7 मंत्रिपदं मिळणार अन् मीच रायगडचा पालकमंत्री होणार”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

| Updated on: Jul 11, 2023 | 3:55 PM

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारा कोणा-कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशात रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी सूचक विधान केलं आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारा कोणा-कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशात रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी सूचक विधान केलं आहे. “लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एक ते दोन दिवसांमध्ये हा विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्हाला तयारीत राहायला सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही तयारीत बसलो आहे. कधीही कॉल येईल तसं आम्ही निघू.शिवसेनेला 7 मंत्रिपदं मिळतील. तसंच भाजपलाही सात मंत्रिपदं मिळणार आहेत. आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्या पद्धतीने हा विस्तार होईल.आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळणं शक्य नाही. हे राष्ट्रवादीलाही ठाऊक आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार आहे. आमचे तिथं पाच आमदार आहेत. मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलाय ते शब्द ते पाळतील असा मला विश्वास आहे,” असं गोगावले म्हणालेत.

Published on: Jul 11, 2023 03:55 PM