निधी वाटपात अपहार? आमदार भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी…

निधी वाटपात अपहार? आमदार भरत गोगावले म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी…”

| Updated on: Jul 24, 2023 | 1:19 PM

अजित पवारांनी काही आमदारांवर निधीचा वर्षाव तर काही आमदारांवर दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निधीवाटपात अपहार झाला असून निधीवाटप हा संशोधनाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. यावरून भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 24 जुलै 2023 | अजित पवारांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही आमदारांवर निधीचा वर्षाव केला. तर काही आमदारांवर दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निधीवाटपात अपहार झाला असून निधीवाटप हा संशोधनाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. यावरून भरत गोगावले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सगळ्यांना व्यवस्थित निधी दिला आहे. कोणाचीही तक्रार नाही. कोणाला तक्रार असेल तर आम्हाला सांगा. ज्यांनी आपल्या मतदारसंघातील कामे सुचवली होती, त्यांना तसा निधी मिळाला आहे. ज्यांना कमी कामं सुचवली, कोणी जास्त सुचवली. जी कामं सुचवली त्या अनुषंगाने निधी मिळाला. एखादा अपवाद असेल तर सुधारणा करता येईल. कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे. आमदार समाधानी आहेत, काळजी करण्याचं कारण नाही.”

 

Published on: Jul 24, 2023 01:19 PM