“रायगडचा पालकमंत्री मीच होणार”, भरत गोगावले आपल्या वक्तव्यावर ठाम!
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्य मंत्रिमंडळावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुक आमदार मंत्रिमंडळाकडे आस लावून बसले आहेत. त्यांच्यापैकीच एक महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे आपल्या पालकमंत्री पदावर ठाम आहेत.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्य मंत्रिमंडळावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अनेक इच्छुक आमदार मंत्रिमंडळाकडे आस लावून बसले आहेत. त्यांच्यापैकीच एक महाडचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे आपल्या पालकमंत्री पदावर ठाम आहेत. ते म्हणाले की, “भविष्यामध्ये लवकरच कॅबिनेट विस्तार होईल. कार्यकर्ते जे मला भेटायला आलेत आणि त्यांचं प्रेम आहे म्हणून ते माझ्याबद्दल घोषणाबाजी करत आहेत.भविष्यामध्ये कॅबिनेट विस्तार होईल असा मला वाटते, काल आणि आज या दोन दिवसांमध्ये विस्तार होईल असा आम्हाला सांगण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही सुद्धा उत्साही होतो. पण आज मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की भविष्यात जेव्हा केव्हा कॅबिनेट विस्तार होईल त्यावेळी तुम्हाला फोन केला जाईल आणि तेव्हा आम्ही सर्व ताकदीनिशी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊ कॅबिनेट पदाची शपथ घेऊ, आज कॅबिनेट विस्तार होणार नाही. राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलीही धुसफुस नाहीये. सुनील तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पालकमंत्री पदासाठी त्यांची कुठलीच नाराजी नाही आणि पालकमंत्री मीच होणार, तडजोड केली जाणार नाही.”