मंत्रीपदावरून नाराज असणाऱ्या भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आमदारांनी मंत्रिपदासाठी शिंदे यांना ब्लॅकमेल केलं’
शिंदे-फडणवस सरकार सत्तेत येऊन जवळ जवळ सव्वा एक वर्ष आता होत आहे. या कालावधीत सरकारचा दोन वेळा विस्तार झाला आहे. तर आता पुन्हा एखादा विस्तार होईल अशी चर्चा आहे. मात्र याच दरम्यान शिंदे गटातील एका नेत्याने मोठा दावा केल्याने सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.
रायगड :17 ऑगस्ट 2023 | राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दुसरा विस्तार झाला आणि त्यात अजित पवार गट सामिल झाला. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. तर त्यांना मंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं आहे. याचदरम्यान आता शिंदे गटातील एका नेत्यामुळे सत्तासंघर्षाचा तो काळ पुन्हा समोर उभा ठाटला असून सत्ता स्थापना आणि पहिल्या मंत्रि मंडळाच्या शपथविधीचा किस्सा समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी याबाबत मोठं वक्तव्य करताना गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडालेली आहे. गोगावले यांनी शिंदे गटातील लोक कसे नाराज होते. आणि त्यांनी मंत्रिपदे अशी आपल्या पदारात पाडून घेतली. तर त्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे यांना कसं ब्लॅकमेल केलं याचा मजेदार किस्से सांगताना चक्क अनेकांचा भांडाफोडच केला आहे. तर मंत्रिपदाची मागणी करणाऱ्यांची संख्याच वाढल्याने आपणच काढता पाय घेत थांबलो ते आजपर्यंत थांबलोच असेही ते म्हणालेत. तर एका नेत्याने मंत्रीपदासाठी चक्क नारायण राणे संपवायला निघालेत असा दावा केला होता. तर एकाने आपली पत्नी आत्महत्या करणार होती असं म्हटल्याचेही गोगावले यांनी सांगितलं. त्यामुळे आता नारायण राणे कोणाला संपवायला निघाले होते. तर असा कोण आमदार आहे ज्याची पत्नी मंत्रि पदासाठी आत्महत्या करणार होती असे सवाल आता समोर येत आहेत.