8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढायला..., भरतशेठ गोगावले यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

“8 मजली मातोश्रीच्या पायऱ्या चढायला…”, भरतशेठ गोगावले यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

| Updated on: Jul 27, 2023 | 1:31 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजप नेत्यांनी ही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.”उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो, त्यांना चांगले आरोग्य लाभो”. तसेच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीकेवरही गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्ही बंडखोर नाही खुद्दार आहेत म्हणून बाहेर पडलो, तुम्ही बाहेर पडला नाहीत.आम्हाला ऊद्धव यांची भीती वाटत नाही पण आधी बाळासाहेब होते तेव्हा तीन माळ्याची मातोश्री होती, आत्ता 8 माळ्याची नवी मातोश्री झालीये. हे 8 माळे आम्हाला चढायला जमणार नाही. लिफ्ट आहे पण ती मध्येच अडकेल तर आम्ही पण अडकू, म्हणून तिथे जाणार नाही,” असं गोगावले म्हणाले.

Published on: Jul 27, 2023 01:31 PM