तिसरा मंत्रिमंडळ विस्तार : अजित पवार गटाला रेड सिग्नल; शिंदे गटाच्या अशा पल्लवीत, कोणाला लागणार लॉट्री
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासह भाजपच्या काही आमदारांची वर्णी लागणार अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली आणि आपला गट घेत थेट सरकारमध्ये सामिल झाले. ज्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री होण्याचा योग आला.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गट आणि भाजप नाराजी पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटासह भाजपच्या काही आमदारांची वर्णी लागणार अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली आणि आपला गट घेत थेट सरकारमध्ये सामिल झाले. ज्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री होण्याचा योग आला. तर राष्ट्रवादीच्या इतर ८ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचे मंत्रीपद हुकले होते. त्यानंतर ही नाराजी समोर येत होती. याचदरम्यान लवकरच पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात असताना त्यातही अजित पवार गटाला भाजपच्या कोट्यातून मंत्रीपदे मिळणार असे बोलले जात होते. याचदरम्यान नाराजीचा सुर वाढल्याने आता अजित पवार गाटाला मंत्रीपद देण्यात येणार नाही अशी खात्रलायक माहिती मिळत आहे. तर या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या नेत्यांची मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील कोणाला मंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर शिंदे गटाचे भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांना मंत्री पद मिळू शकतं अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.